इतर मागास बहुजन कल्याण विभाग वसतीगृहे प्रवेशासाठी २१ जुलै अंतिम मुदत
वाशिम, दि.५ जुलै (जिमाका) सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, वाशिम यांचे अधिनस्त कार्यरत मुलांचे शासकीय वसतिगृह, आयु. डी. पी. कॉलनी, सोहन ऑटोमोबाईल्सच्या मागे, पुसद रोड, वाशिम व मुलींचे शासकीय वसतिगृह श्री. सत्यनारायण राठी सिटी सेंटर, रविवार बाजार, पाटणी चौक येथील इमारतीत सन २०२४- २५ या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अर्ज वाटप व स्विकारणे बाबत सहाय्यक संचालक, इतरत मागास बहुजन कल्याण, कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, चिखली रोड वाशिम येथे सुरु झालेले आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज सादर करावे.
त्याच प्रमाणे उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार तसेच, संबंधित प्रवर्ग निहाय विहित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. या करिता इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. तसेच प्रवर्गनिहाय आरक्षण इमाव ५१%, विजाभज ३३%, विमाप्र ६%, दिव्यांग ४%, आर्थिक मागास प्रवर्ग ४%, अनाथ २% असे आहे. ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी २१ जुलैनंतर येणाऱ्या अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज सादर करावे. असे आवाहन श्रीमती दीपा हेरोळे सहय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग वाशिम यांनी केले आहे.