क्षुल्लक कारणावरुन मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल होवूनही आरोपींवर कारवाईस टाळाटाळ
फिर्यादीच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमया : वडील घमराव राठोड यांची तक्रार
वाशिम – क्षुल्लक वादावरुन माझ्या मुलाला कुर्हाडीने मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतरही मालेगाव पोलीस आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच आरोपी गावात मोकाट फिरत असून ते फिर्यादीच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमया देत आहेत. त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करण्यासह मालेगाव पोलीसांना समज द्यावी असे तक्रारवजा निवेदन मालेगाव तालुयातील देवठाणा खांब येथील जखमी मुलाचे वडील घमराव राठोड यांनी २१ जून रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, लग्नात झालेल्या क्षुल्लक कारणावरुन गैरअर्जदार मुकेश राठोड, शामराव राठोड यांनी माझा मुलगा किरण राठोड याला कुर्हाडीने जबर मारहाण केली. या मारहाणीत माझ्या मुलाच्या पायाला जबर जखम झाली असून त्याच्यावर वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. यानंतर १६ मे रोजी माझ्या मुलाची पत्नी सौ. निकिता किरण राठोड हिने मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गैरअर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र गुन्हे दाखल होवून एक महिना लोटूनही मालेगाव पोलीसांकडून आरोपींना अटक करण्यात आली नाही. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढली असून आरोपी हे मला व माझ्या कुटुंबियांना जिवे डलह आवक लिपीक मारण्याच्या धमया देत आहेत. याबाबत मालेगाव पोलीसांची भूमिका संशयास्पद वाटत असून मालेगाव पोलीस हे जाणूनबुजून आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीत. त्यामुळे मालेगाव पोलीसांचे गैरअर्जदारांसोबत आर्थिक हितसंबंध वा साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे. सद्या आरोपी गावात मोकाट फिरत असून मला व माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमया देत आहेत. याप्रकरणी आरोपींना त्वरीत अटक करावी व तपासात ढिलाई करत असल्याबाबत मालेगाव पोलीसांना समज द्यावी. अन्यथा आम्हाला आमच्या कुटुंबांसह व मुलाबाळांसह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा घमराव राठोड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.