तामकराड संस्थान वर जाणाऱ्या चिखल सदृश्य रस्त्यातून भाविकांची वाटचाल

तामकराड संस्थान वर जाणाऱ्या चिखल सदृश्य रस्त्यातून भाविकांची वाटचाल

मालेगाव – वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले मालेगाव तालुक्यातील तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले ऋषी महाराज संस्थान तामकराडा हे रेगाव पासुन दक्षिण दिशेला असलेल्या वनविभात आहे. अती प्राचीन काळाची परंपरा आसलेले व लाखो भाविकांचे भक्तीस्थान व श्रध्दासथान असलेल्या तामकराड संस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी भाविका मधुन अने क दिवसांपासून होत आहे, ऋषी माहाराज संस्थान तामकराडा या नावाने प्रसिध्द झाले असून नागपंचमी च्या दिवशी येथे यात्रेचे स्वरूप येत असुन श्रावण महिन्यात लाखोच्या संख्येने भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात तसेच प्रत्येक दर सोमवारला भाविक

दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. भाविक भक्तांना जाण्यासाठी आसलेला रस्ता सततच्या पाऊसा मुळे दलदल होऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण असूनतामकराड स्थानकडे जाण्याचा मार्ग हा खूप दूर अवस्थेत असून अक्षरशः त्या रस्त्याने चालता सुद्धा येत नाही. अनेक महिला भाविकांची लाखोंच्या संख्येने दर्शनाकरीता जिल्हयातुन नव्हते महाराष्ट्रातुन ऋषी महाराजांवर

असलेल्या ध्दे पाई भाविक चारीही

दिशेन जंगलातुन वाट काढत मिळेल त्या रस्त्याने दाखल होतात. अनेक दिवसांपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाप्रती तसेच लोकप्रतिनिधी कोणती नाराजी व्यक्त केली, जात असून याचा फटका येणाऱ्या सर्व निवडणूकावर परिणाम होणार हे मात्र खरे… आज रोजी संस्थान ची देखरेख व जंत्रेकरीता येणाऱ्या भाविकांकरीता महाप्रसादाची सर्व व्यबस्था पुजारी बबन महाराज मोहळे रेगाव व भक्त मंडळी पहात आसुन अति

प्राचीन काळात ऋषी महाराजे ठाणे दुर्मीळ ठिकाणी जंगलात तिर्थक्षेत्रा करीता लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने या तामकराड संस्थानची योग्य दखल घ्यावी आसी मागणी भाविक भंक्ताकडुन होत आहे. वाशिम जिल्ह्यात श्रावण महिन्यातील अनेक महादेवाची देवस्थान जीर्णहोत चालली असून संबंधित यंत्रणा प्रशासन आणि पुढारी यांनी खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )