भाजपा युवा मोर्चा वाशिम शहराच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व विजय स्तंभाला अभिवादन
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी बालाजी ठेंगडे) भाजपा युवा मोर्चा वाशिम शहराच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे माजी सैनिकांचा सत्कार व विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कॅप्टन साईदास वानखेडे, रामभाऊ ठेंगडे (माजी सैनिक), मोहन गोरे या माजी सैनिकांचा सत्कार उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार विजयराव जाधव, माजी नगरसेवक राहुल तुपसांडे, नितेश मलिक, प्रभाकरराव काळे धनंजय घुगे, सरचिटणीस गणेश खंडाळकर, सुनील तापडिया, राजू कलवार, बंटी सेठी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गिरीश शर्मा, सचिन शर्मा, भिकाजी ढगे, सचिन पेंढारकर, वसंतराव धाडवे,
युवा मोर्चा शहराध्यक्ष वैभव उलेमाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मायाताई वाघमारे, जिल्हा सरचिटणीस हेमलता विसपुते, जिल्हा उपाध्यक्ष रूपालीताई देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.