मंगळवारी महिला लोकशाही दिन
बुलडाणा : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने जून महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवार, दि. १८ जून २०२४ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जून २०२४ मधील तिसऱ्या सोमवारी सुट्टी असल्याने हा महिला लोकशाही दिन मंगळवारी घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.
CATEGORIES BULDHANA
TAGS Hot News