राष्ट्रीय राजमार्गाचे बांधकाम कधी पुर्णत्वास जाणार

प्रशासन कुभंकर्णी झोपेत

मानोरा – अकोला ते माहूर या राष्ट्रीय राजमार्ग वन विभागाची जमीनी मधुन जात होता, त्या रत्याचे बांधकाम वन विभागाच्या परवानगीमुळे अद्याप पर्यंत थांबले होते. परंतु याची परवानगीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवुन सुद्धा राष्ट्रीय राजमार्ग च्या प्रशासन व बांधकाम कंपनीच्या कुभंकर्णी झोपेमुळे नाहकच नागरीकांना खड्ड्यामधुन प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे अनेक प्रवाशांना कमरेचे आजार जडले आहे.

तालुयातील पंचाळा ते वाईगौळ पर्यंतचा रस्त्याची जमीन ही वन विभागाची असून, याच भागामधुन राष्ट्रीय राजमार्ग क्रं १६१ अकोला ते माहुर जात आहे, मागील तीन ते चार वर्षापासुन महामार्गाचे रस्ते बांधकाम सुरु झाले होते. मंगरुळनाथ ते दिग्रस पर्यंत वन विभागाच्या हद्दीमधील परवानगी अभावी बाधकाम थांबले होते, बाकी सर्व रस्त्याचे बाधकाम झाले आहे. वन विभागाच्या जमीनी वरील रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहे. येणार्या काही

दिवसामध्ये पावसाळा सुरु होणार आहे, तेव्हा काळ्या मातीच्या यारस्त्यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण ने यावर कोणत्याही प्रकारे दुरुस्ती केली नाही तर त्यामुळे अपघाताची शयता नाकारता येणार नाही. सदर रस्त्याचे बाघकाम वनवीभागाच्या परवानगीसाठी रस्त्याचे बांधकाम थांबले होते. मात्र, केद्र शासनाकडुन वन संवर्धन अधीनीयम १९८० अंतर्गत वन क्षेत्राच्या मर्यादेत २६ ऑगस्ट २०२१ रोजी रस्ते प्राधिकरणाने तत्वता रस्ते बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली होती. या पत्रामधील अटी नुसार रस्त्याचे बांधकाम सदर बांधकाम कंपनी

ने करावे व शर्तीचे हमीपत्र सदर कंपनीने वनवीभागाकडे द्यावा, अशा स्वरुपातील वन विभागाकडुन बांधकामाची मंजुरी मीळुन सुद्धा मागील दोन वर्षापासुन सदर बांधकाम कंपनी ही नागरीकांच्या जीवनाशी खेळत आहे. काळया मातीच्या या रस्त्यावर जागो जागी खड्डे पडल्या मुळे या रस्त्यावर कीरकोळ अपधात घडत आहे तर अनेक प्रवास करणार्या इसमांना मणयाच्या आजाराने ग्रासले आहे. बाधकांम करण्याची परवानगी मिळुनसुद्धा बाधकाम कंपनी काम करत नाही हे मात्र कळत नाही. एखादा भीषण अपघात झाला तरच प्रशासन व बांधकाम कंपनी जागी होईल काय असा सवाल प्रवाशी उपस्थित करीत आहे.

CATEGORIES
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )