शेतकरी बंधूंनो ! पिक विमा काढला का ?
वाशिम – जिल्ह्यामध्ये खरिप पिकाच्या पेरणी अंतिम टप्प्यात आहेत.
आपण पेरणी केलेले पीक नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये नष्ट होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत सदर पिकाला विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता आणि ज्यांचे पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यामध्ये १५३ कोटी मदत मिळाली आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्या पिकाचा पिक विमा काढणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण आपल्या नजीकचे सामायिक सुविधा केंद्र, बँक यांच्याकडे प्रती अर्ज १ रुपया भरून निःशुल्क पिक विमा अर्ज करू शकता. तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता अंतिम तारीख १५ जुलै असून शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच पिक विमा काढुन
घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.