सिटी न्यूज चे पत्रकार अजय शिंगारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) – वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहराध्यक्ष रुग्णाच्या सुरेश भाऊ तायडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १०/८/ २०२४ रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले होते सिटी न्यूज चे कर्तव्यदक्ष पत्रकार अजय भाऊ शिंगारे यांच्यावर इरविन हॉस्पिटल येथे एका मृत व्यक्तीच्या परिवाराला न्याय देत असताना तेथील ठेकेदाराने अजय भाऊ सिंगारे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला या हल्ल्याचा वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती तर्फे जाहीर निषेध करण्यात आला या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून मीडिया आहे मीडियातील काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला पोलीस प्रशासनाने मदत करायला
हवी व ज्या हल्लेखोराने पत्रकारावर हल्ला केला त्या हल्लेखोराला तात्काळ अटक करून त्याला कठोर अशी शिक्षा होईल अशी मागणी आपण लवकरच पोलीस आयुक्त यांना भेटून करणार आहोत असे मनोगत महानगराध्यक्ष रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी या निषेध बैठकीमध्ये केले आहे या बैठकीला बाळासाहेब गारोडे राष्ट्रपाल वानखडे सिद्धार्थ दामोदरे प्रभू तायडे दिलीप प्रधान आदेश मिटांगे सुरेश इंगोले सुरेश गुडदे प्रफुल चक्रे सुनील गायकवाड अमोल तायडे समीर निकोशे सागर पाचोडे राजेश तायडे सुरेंद्र खडसे अनिल गडलिंग तांबे साहेब भगत काका मिलिंद दामोदरे माधुरी बनसोड थोरात ताई जय हुमणे शालू गाडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते