८२ वर्षीय निराधार वृद्ध माऊलीचा वृद्धाश्रमात आश्रय
प्रतिनिधी सतिश पैठणै
चिखली – मेहकर तालुक्यातील एका गावातील वृद्ध माऊली त्यांना चार अपत्य दोन मुलं दोन मुली असून ते आपल्या जन्म दात्याआईचा सांभाळ करीत नाही. या वृद्ध माऊलीचे पती वृद्धापकाळाने मरण पावले त्यांच्या कडे ८ एकर शेती होती. ति शेती तिने दोन्हीही मुलांना वाटून दिली. त्यानंतर मुलांनी त्या वृद्ध माऊली ला घरा बाहेर काढून दिले तेव्हापासून तिला दोन्ही मुलीकडे राहत होती. तिच्या दोन्ही मुली व जावई नातवंड तिचा सांभाळ करण्यास तयार आहेत परंतु ती जुन्या विचाराची आहे मी जावई च्या घरी आता जास्त दिवस
राहू शकत नाही मी माझ पाहून घेईल मी जाते असे म्हणून ती मेहकरला आली तिची भेट सामाजिक कार्यकर्त्यां साँ जयाताई जयधे वर वाघ यांच्याशी झाली त्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी चिखली येथील आंबेडकरी चळवळीचे निःस्वार्थ सामाजिक काम करणारे भाई विजयकांत गवई यांच्याशी संपर्क केला त्यांनी सल्ला दिला कि त्या निराधार वृद्ध माऊलीला भोकर येथील वृद्धाश्रमात दाखल करू त्यावर त्यांनी व वृद्ध माऊलीने होकार दिल्याबरोबर भाई विजयकांत गवई यांनी निराधार लोकांची निःस्वार्थ पणे सर्व प्रकरची मोफत सेवा देणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना संपर्क करून निराधार वृद्धमाऊली ला
वृद्धाश्रमात प्रवेश देण्यास विनंती
केली. यावरून आश्रम ची पूर्ण कागदोपत्री कारवाई करून सदर निराधार वृद्ध माऊली ची माहिती चिखली पोलीस स्टेशन ला देऊन तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे प्रवेश देण्यात आला आहे. यावरून लक्षात येते कि जे आई वडील आपल्या मुलांना तळ हातांच्या फोडा प्रमाणे जपत लहानचे मोठे करतात आणि वृद्धावस्था मध्ये ते आपली काळजी घेतील या आशेवर जगत असतात मात्र आजच्या स्वार्थी जमान्यात काही स्वार्थी लोक आपल्या आई वडिलांचा सांभाळ न करता त्यांना रस्त्यावर सोडून देतात. आजही असे अनेक निराधार वृद्ध आहेत परंतु त्यांना
वृद्धाश्रमाची माहिती नसल्याने ते
आजही भटकंती करीत आहे. असे निराधार वृद्ध आजी आजोबा, विधवा, घटस्फोटीत महिला व अनाथ बालके कुठे हि निदर्शनास आल्यास कृपया आमच्या शी संपर्क करावा किंवा थेट मानवसेवा प्रकल्प च्या हेल्प लाईन नंबर ८८५५८५०३७८ वर संपर्क करावा असे आवाहन या वेळी आंबेडकरी चळवळीचे सामाजिक नेते भाई विजयकांत गवई यांनी केले आहे. यांनी अनेक सामाजिक कार्य केलेले आहे त्यात आज निराधार वृद्ध माऊली ला वृद्धाश्रमात प्रवेशित करून एक फार मोठे सामाजिक कार्य केले आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.