आदिनाथ प्रभू रथयात्रेचे मालेगावात जल्लोषात स्वागत
मालेगाव – चेन्नई येथून निघालेली श्री आदिनाथ प्रभू भगवंताची
रथयात्रेचे मालेगाव शहरात आगमन झाले. या रथयात्रेचे श्री आदिनाथाचा जयघोषात शहरात श्वेतांबर समाजबांधवा तर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचधातूची भव्य प्रतिमा असलेल्या श्री आदिनाथ भगवंताच्या मूर्तीची पूजा आरती करून दर्शन घेतले. तीर्थप्रभावना शासन प्रभावना म्हणून चेन्नई ते गुजरात पालीताना श्री आदिनाथ भगवान च्या पंचधातू मूर्तीची रथयात्रा काढण्यात आली. आचार्य पपू अजित शेखर सुरेश्वर महाराज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनात काढण्यात आलेली ही रथ यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून मालेगाव शहरात दाखल झाली. रथ यात्रेचे मालेगाव येथे आगमन होताच शहरातील श्वेतांबर समाज बांधवातर्फे या रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित समाज बांधवा तर्फे श्री आदिनाथ प्रभू यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. तसेच यावेळी सामूहिक चैत्य वंदन करण्यात आले. रथ यात्रेच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी श्री आदेशवर जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष पारसमल गोलेच्छा, विश्वस्त अनिल गादिया, शिखरचंद संचेती, अॅड. आशिष गोलेच्छा, ललित संचेती, संयम गोलेच्छा, मयंक गोलेच्छा, ज्योती गादिया, सुशीला गोलेच्छा, शिल्पा संचेती, प्रिया गोलेच्छा यांच्यासह बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.