उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधी यांच्याशी साधणार संवाद



वाशिम, दि. २४ जुलै (जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबतची माहिती देण्याकरिता राज्यातील सर्व

विद्यार्थी पालक व संस्था प्रतिनिधी यांचे सोबत चंद्रकांत पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.

तरी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आपापल्या संस्था महाविद्यालय विद्यापीठांमध्ये मोठ्या पडद्यावर स्क्रीनवर सर्व विद्यार्थी व पालक यांना दिसेल व ऐकू येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात यावी

व याकरिता आपापल्या संस्थेतील विद्यापीठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व पालक यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे बाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात यावे.

या कार्यक्रमासाठी वेबिनारची लिंक खालील प्रमाणे आहे. http:/ /www.parthlive.com असे आवाहन सहसंचालक, डॉ. सुबोध भांडारकर उच्च शिक्षण, अमरावती विभाग, अमरावती यांनी केले आहे.

CATEGORIES
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )