एक गाव एक स्मशानभूमी !
सीईओ वैभव वाघमारे यांची भेट
वाशीम अनेक गावांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या धर्म आणि जातीची स्वतंत्र स्मशानभूमी पहावयास मिळते. एखाद्या समूहाला स्मशानभूमी नसल्यास इतर स्मशानभूमी मध्ये त्यांना अंत्यविधी करण्यासाठी मज्जाव केला जात असल्याच्या घटनाही पहावयास मिळतात. मात्र, वाशीम जिल्ह्यातील ढोरखेडा हे गाव याला अपवाद ठरले आहे. या गावात सर्व लोकांसाठी एकच स्मशानभूमी असल्यामुळे लोकांमध्ये सामाजिक सलोख्याचे वातावरण पहावयास मिळत आहे आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आज, २५ जुलै रोजी ढोरखेडा या गावाला भेट दिली. गावातील विकास कामाची पाहणी करत असताना त्यांना एक गाव एक स्मशानभूमी असे फलक दिसले. तेंव्हा याबाबत त्यांना सरपंच | सुनीता मिटकरी यांनी माहिती दिली.
यावेळी सीईओ वाघमारे यांनी गावातील शाळा व अंगणवाडीत मुलांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सभेमध्ये सीईओ वाघमारे
यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परीषद शाळेचे उद्घाटन प्रसंगी गुंफाबाई नाथा हीवराळे, अंजली विनायक सावळे, किरणबाई गव्हाणकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबनराव
मिटकरी, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, ग्रामसेवक मोहन वानखेडे, सरपंच सुनीता मिटकरी, रोजगार सेवक अरुण सावळे, ग्रामपंचायत कर्मचारी निखिल जारे, वैभव मिटकरी, गणेश सावले, अभिषेक मिटकरी, अक्षय मिटकरी, बचत गटातील सर्व महिला व गावकरी मंडळी उपस्थित होते. ढोरखेडा या गावाने एक गाव एक स्मशानभूमी च्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिला आहे. इतर गावांनीही याचा बोध घेऊन हा उपक्रम राबवावा, असे मत जिप मुकाअ वैभव वाघमारे यांनी व्यक्त केले.