‘एक पेड माँ के नाम’ अभियानातून एनसीसी विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणाचा संदेश
वाशिम – केंद्र शासनाच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये ‘एक पेड माँ के नाम’ ही योजना तसेच राज्य सरकारच्या वतीने ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ योजना रविण्यात येत आहे. त्याअंतर्गत बुधवार, १७ जुलै रोजी ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोलाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. बदोला यांच्या मार्गदर्शनात एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात श्री बाकलीवाल विद्यालयाच्या ५० एनसीसी विद्यार्थ्यांनी शहरात वृक्षदिंडी काडून ‘झाडे लावा झाडे जगवा’ व ‘एक पेड माँ के नाम’ नारे देत शहरातुन रॅली काढली व नागरीकांना झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला.
दरम्यान समाजसेवक मनीष मंत्री
סםयांच्यातर्फे विद्यार्थ्यांना ५० वृक्षरोप भेट देण्यात आले. प्रत्येकाने जर एक झाड लावले तरी आपला निसर्ग हिरवागार होऊन जाईल. आपल्याला स्वच्छ हवा मिळेल व आपली पुढील पिढी अनेक समस्यांपासून सुरक्षित राहील. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करण्याची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे लावा देश वाचवा हा संदेश आपल्या उपक्रमातून देत
विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा परिसर, शाळेचा परिसर, घराच्या परिसरात, शेताच्या परिसरात जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करून संदेश दिला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.