एचआयव्हीग्रस्त ३० बालकांना शालेय साहित्याचे वाटप
वाशिम, दि. १७ जुलै (जिमाका) जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने एचआयव्हीग्रस्त ३० बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण वानखडे, बालरोग तज्ञ डॉ. राहुल ईढोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, डॉ. अविनाश झरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजामध्ये एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांकडे बघण्याचा दृष्टीकोन हळुहळु सकारात्मक होत चालला आहे. अशा बालकांना मानसिक आधाराची, प्रेमाच्या शाबासकीची अत्यंत आवश्यकता असते. अशा
बालकांना समुहामध्ये सामान्य बालकांप्रमाणे वागणुक दिल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. यामधुनच त्यांना त्यांच्या शरिरातील आजारावर मात करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या प्रदान होते. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि दाणशुर व्यक्तींना पाचारण करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची संकल्पना त्यांच्या सहकार्याने आखली. या संकल्पनेनुसार वितरित करण्यात आलेल्या शैक्षणिक किटमध्ये स्कूल बॅग, रजिस्टर, कंपास, बॉटल, टिीन, बूट, पेन पेन्सिल इ. साहित्याचा समावेश होता. यामुळे एचआयव्हीग्रस्त मुलांमध्ये शिक्षणाची जिज्ञासा निर्माण होऊन त्यांना शिक्षणाची आवड लागेल.
जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांची संख्या आधिच्या तुलनेत कमी झाली आहे. एचआयव्हीसह जगणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन अलिकडच्या काळात अत्यंत सकारात्मक झाला. ही बाब अतिशय चांगली आहे. यामुळे सामान्य जीवन जगण्याचे बळ मिळते. सामाजिक संस्थांनी आणि दानशुर व्यक्तींनी अशा स्वरूपाच्या भावंडांना योग्य वेळी मायेचा आधार दिल्यास निश्चितच समाजात चांगला पायंडा पडु शकतो. डॉ. अनिल कावरखे जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
हा त्यामागचा मुख्य हेतु आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चव्हाण, धोंगडे, जिल्हा पर्यवेक्षक रवी भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता मुंडाले, संचालक गौतम ढाले, विहान या
सामाजीक संस्थेचे कर्मचारी रुपेश भगत, मंजुळा गिरी, विद्या देशमुख, नितीन भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले. संचालन चंद्रशेखर भगत यांनी तर आभार रुपेश भगत यांनी मानले.