एनसीसी विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश

वाशिम – जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरी यांच्या मार्गदर्शनात तसेच एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात २७ जुन रोजी स्थानिक शासकीय रुग्णालयाच्या परिसरात श्री बाकलीवाल विद्यालयाच्या ४५ एनसीसी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश दिला. तसेच झाडे जगविण्याचा संकल्प केला.
यावेळी बोलतांना डॉ. अनिल कावरखे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, प्रत्येकाने जर एक झाड लावले तरी आपला निसर्ग हिरवागार होऊन जाईल. आपल्याला स्वच्छ हवा मिळेल व आपली पुढील पिढी अनेक समस्यांपासून सुरक्षित राहील. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करण्याकडे भर द्यावा लागेल, असे ते म्हणाले. झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे लावा देश वाचवा हा संदेश आपल्या उपक्रमातून देत एनसीसी विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा परिसर, शाळेचा परिसर, घराच्या परिसरात, शेताच्या परिसरात जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे जगविण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाला आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )