:max_bytes(150000):strip_icc()/cow-playfully-cuddling-another-young-cow-lying-down-in-a-field-under-a-blue-sky--calves-love-each-other-1282528841-cb3871fc5b7a4d6082a4a8b35614e4df.jpg?w=1500&resize=1500,1000&ssl=1)
Image Source:treehugger.com
गायीच्या कोठ्याला आग दोन गायचा होरपळून मृत्यू
मालेगाव : मेडशी येथील प्रभाकर देवाबा तायडे यांच्या वाकळवाडी शिवारात शेत आहे . त्यांच्या शेतात जनावराचा कोठा तसेच शेती उपयोगी साहित्य ठेवण्याची व्यवस्था आहे. दिनांक 2 जून रोजी त्यांच्या शेतातील कोठ्याला दुपारी एक ते दोन च्या सुमारास अचानक आग लागल्याने त्या त्यांच्या कोठ्यातील दोन गाईच्या ओव्हरकडून मृत्यू झाला असून त्याशिवाय शेती उपयोगी वस्तूमध्ये बैलगाडी ताडपत्रींकर पाईप इत्यादी वस्तूचा जवळपास दोन लाख रुपयांच्या मुद्देमाल जाळून खाक झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट संजू शकले नसले तरी कोठ्यातील दोन गाई गेल्यामुळे शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळला .तरी शासनाच्या वतीने सदर नुकसानीच्या पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .