चाहते व मित्रमंडळींच्या वतीने डॉ. सिध्दार्थ देवळे यांचा सत्कार

वाशिम – वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ अध्यक्ष तथा वैद्यकिय व सामाजीक क्षेत्रात अग्रेसर असलेले सेवाभावी व्यक्तीमत्व डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या ३ जुलै रोजी स्थानिक विठ्ठलवाडी सभागृहात पार पडलेल्या वाढदिवस कार्यक्रमात सामाजीक कार्यकर्ते इरफान कुरेशी आणि मित्रमंडळाच्या वतीने तब्बल २५

फुटाचा गुलाब फुलांचा पुष्पहार देवून डॉ. देवळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी राजकीय व सामाजीक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याला जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील जवळपास ८ ते १० हजार जणांनी उपस्थिती दर्शवून डॉ. देवळे यांना उदंड आयुष्याच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी इरफान कुरेशी यांच्यासह माजी खा. अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, जि.प. सभापती तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, जि.प. उपसभापती चक्रधर गोटे, जि.प. सदस्य दिलीप देशमुख, डॉ. सुधीर कव्हर, अनिल केंदळे, बाजार समिती संचालक राजु चौधरी, सहकारी बँक संचालक दिलीप जाधव, बाजार समिती संचालक दत्ता गोटे, सुभाष राठोड, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. किरणताई गिर्हे, ज्योतीताई इंगळे, नारायण घोडके, दौलत इंगोले, पांडुरंग कोठाळे, गणेश देशमुख, दिगंबर खोरणे, डॉ. कैलास दागडीया, डॉ. नारायणराव गोटे, डॉ. जयश्री गुट्टे, डॉ. हरीष बाहेती, डॉ. सारडा, डॉ. बिबेकर, हाजी सुभानभाई, हाजी युनुस कुरेशी, अल्ताफभाई, मुज्जमील, अॅड. राठी, चरण गोए, विनोद पट्टेबहादूर, दामुअण्णा गोटे, दीपक खडसे, बालाजी वानखेडे, महादेवराव काकडे, विष्णू काटेकर, नितीन करवा, गजानन गोटे, इमरान कुरेशी, अनंता काळे, असलम सिद्दीकी, विनोद नागरे, प्रा. दिलीप जोशी, श्याम दुरतकर, अकील तेली, विशाल सोमटकर, साबीर मिर्झा, आसीफखान यांच्यासह राजकीय, सामाजीक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची डॉ. देवळे यांचे अभिष्टचिंतन केले.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )