जागतिक व एशियन योगासना स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने १३ वर्षीय राष्ट्रीय पिस्टल शुटर प्राची शिवपुरे हिचा सत्कार
जागतिक व एशियन योगासना स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने १३ वर्षीय राष्ट्रीय पिस्टल शुटर प्राची शिवपुरे हिचा सत्कार
वाशिम – गत १० जूनला भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पिस्टल शुटींग स्पर्धेत ५३५ गुण घेवून चमकदार कामगिरी करणार्या येथील १३ वर्षीय राष्ट्रीय पिस्टल शुटर कु. प्राची रमाकांत शिवपुरे हिचा व इतर खेळाडूंचा जागतिक व एशियन योगासना स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष तथा मालपाणी उद्योग समुहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम १४ जुन रोजी शेलु रोडवरील हॅप्पी फेसेस शाळेत पार पडला.
कु. प्राची शिवपुरे हिने राष्ट्रीय पिस्टल शुटींग स्पर्धेत ५३५ गुण घेतल्यामुळे तीची इंडीया ट्रायल करीता निवड झाली. त्यामुळे प्राची सोबत पिस्टल शुटींग खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे रायफल शूटर सत्यम चंद्रकांत झळके, राष्ट्रीय रायफल शूटर दिव्या सुरज खडसे, राष्ट्रीय रायफल शूटर ध्रुव प्रल्हाद आळणे या सर्व राष्ट्रीय खेळाडूंचा डॉ. संजय मालपाणी, वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शंकरलाल हेडा, डॉ. सरोज हरिष बाहेती, वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे सचिव निशा गंगाधर शिवणकर, डॉ. रोशन बंग, तायक्वांडो असोसिएशनचे सचिव रणजित कथडे, रोहित हेडा आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गोविंद पाटील, राम धनगर, राजु डोंगरदिवे, गजानन मोहळे, कमलाकर, चंद्रकांत झळके, जितेंद्र राजेश एरम, मनोज अशोक इटेकर, अनिता अशोक इटेकर, सुनीताबाई एरम, वैष्णवी मनोज इटेकर, चेतना छोटू इटेकर, किर्ती रमाकांत शिवपूरे, रमाकांत चंद्रकांत शिवपुरे यासह प्रशिक्षक प्रल्हाद गंगाराम आळणे उपस्थित होते.