जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा
जिल्हा योगासन व स्पोर्ट असोसिएशनचे आयोजन
वाशीम महाराष्ट्र योगासन क गट पुरुष आणि महिला स्पोर्ट्स असोसिएशन संलग्नित वाशीम जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय योगासन स्पधेर्चे आयोजन २८ जुलै रोजी वाशीम येथील हॅपी फेसेस द कॉसेप्ट स्कुलच्या प्रांगणामध्ये करण्यात आले असून, या स्पर्धेत अधिकाधिक योगपटुंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप हेडा यांनी केले आहे.
या जिल्हास्तरीय योगासन स्पधेअंतर्गत सब ज्युनिअर गट मुले-मुली, ज्युनिअर गट मुले- मुली, सीनियर गट मुले व मुली, आणि सीनियर अ गट, सीनियर ब गट, आणि सीनियर
खेळाडु व योगपटुंना भाग घेता येणार आहे, अशी माहीती वाशीम जिल्हा योगासन व स्पोर्ट असोसिएशनचे सचिव तेजस कव्हर यांनी दिली. सदर स्पर्धेकरिता २७ जुलै पर्यंत ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करणे अनिवार्य असून स्पर्धेकरिता २०० रुपये नोंदणी शुल्क तर एक पेक्षा अधिक क्रिडा प्रकारात सहभाग नोंदवायचा असल्यास प्रति योग प्रकारानुसार १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर योग स्पर्धा या पारंपारिक, वैयक्तिक, कलात्मक, कलात्मक जोड याप्रमाणे होणार आहेत. तसेच स्पर्धकाला योगाचा पोशाख परिधान करणे अनिवार्य राहणार
असून, स्पर्धेच्या दिवशी आधार कार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र, एमबीबीएस किंवा बीएएमएस डॉटरांच्या स्वाक्षरीने वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणने गरजेचे आहे.
स्पधेर्चे विहीत शुल्क भरून ऑनलाईन रीतसर नोंदणी केलेल्या ज्या स्पर्धकांची यादी राज्य संघटने कडून प्राप्त होईल त्या स्पर्धकांनाच जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत सहभाग मिळणार आहे. नोंदणी व अधिक माहीतीसाठी वाशीम जिल्हा योगासन व स्पोर्ट असोसिएशनचे सचिव तेजस कव्हर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप हेडा यांनी केले आहे.