जिल्ह्यात तुती लागवडीला सुरुवात

वाशिम रेशीम उद्योग करण्यासाठी जिल्ह्यातील १८२ शेतकऱ्यांनी २०३ एकर तुती लागवड करण्यासाठी नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केली आहे. पैकी ५६ एकर क्षेत्रावर मनरेगा अंतर्गत तुती लागवड होणार आहे. उर्वरित १४७ क्षेत्रावर सिल्क समग्र -२ या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत तुती लागवड होणार आहे. माहे जुन ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुती लागवड केली जाते. पूर्वी तुतीच्या फांदीपासून कलम तयार करून लागवड केली जायची. परंतु त्यामध्ये २० ते २५ टक्के तूट / खाडे पडायची. त्यामुळे एकरी ५ हजार ५०० झाडांची संख्या राखली जात नव्हती. पर्यायाने प्रती एकरी २०० अंडीपुंजाचे संगोपन होत नव्हते.

आता तुतीच्या ३ महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपापासून लागवड केली जाते. प्रती रोप रु. ३ ते ४ रोपाची किंमत असते. मनरेगा अंतर्गत रु ३ प्रमाणे ६ हजार रोपांचे रु १८ हजार दिले जातात. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये आलेगाव, अंबाशी, पाचरण या गावात मोठ्या प्रमाणात तुती रोपवाटिका माहे फेब्रु व मार्च २०२४ मध्ये तयार करण्यात

आली आहे. २५ ते ३० लक्ष रोपे तेथे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अग्रिम देऊन तेथील रोपे आरक्षित करून ठेवली आहेत. ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस पडला आहे तेथे तुती लागवडीला सुरुवात झाली आहे. अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी सु. प्र. फडके यांनी दिली आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )