डायलिसिस सेवा रुग्णालयात सुरू होणार कर्मचार्यांना प्रशिक्षण, तंत्रज्ञांचीही होणार नियुक्ती
कारंजा लाड तालुक्यातील शहरासह नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने माजी आ. स्व. प्रकाश डहाके यांच्या अथक प्रयत्नातून कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयाची टोलेजंग इमारत उभी राहिली आणि ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले. परंतु काही सुविधा या रुग्णालयात अपुर्या असल्याने रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावची वाट धरावी लागते. रुग्णांची हीच गैरसोय ओळखून जिल्हा प्रशासनाने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचे काम पूर्ण झाले
असून काही कर्मचार्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवाय मशीन इन्स्टॉलेशनचे काम देखील सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितल्या जात आहे. त्यामुळे जुलै अखेर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. सद्यस्थितीत कारंजा शहरासह ग्रामीण भागात अनेक रुग्णांना डायलिसिस उपचाराची गरज असल्याने त्यांना अकोला, अमरावती, यवतमाळ व नागपूर या मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. शिवाय रुग्णांना ही
येण्या जाण्याचा त्रास होतो. त्यामुळे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने रुग्णांकडून केल्या जात होती. या मागणीची दखल घेत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर मंजूर करण्यात आले आणि त्याचे काम देखील सुरू करण्यात आले. परंतु केवळ प्रशिक्षित डॉटर अभावी ही सेवा रखडली आहे. लवकरच प्रशिक्षित डॉटरची देखील नेमणूक केल्या जाईल आणि काही दिवसात उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू होईल. त्यानंतर रुग्णांचा वेळ, श्रम व पैसा वाचण्यास मदत होईल.