दिव्यांगाच्या भव्य मोर्चा बाबत रिसोड तालुकास्तरीय बैठक
*दिव्यांगाच्या भव्य मोर्चा बाबत रिसोड तालुकास्तरीय बैठक संपन्न*
*२९ अगस्ट रोजी होणाऱ्या दिव्यांगाच्या मोर्चा मध्ये उपस्थित राहा-मनिष डांगे*
आज रिसोड तालुक्यातील दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी रिसोड तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक शासकीय विश्राम गृह येथे दिव्यांगाचे खंबीर नेतृत्व मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हासंघटक दिलीप सातव रिसोड ता अध्यक्ष धनीराम बाजड यांच्या उपस्थितीत सपन्न झाली यावेळी बोलतांना महाराष्ट्र शासनानेचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगाचा भव्य मोर्चा वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे या मोर्चा मध्ये प्रमुख माघण्या लोकसभा ते ग्रामपंचायत पर्यंत आरक्षण, दिव्यांगाला सरसकट घरकुल योजना, दिव्यांगाना ५००० माधन, जिल्हापरिषद पचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिक, नगरपाचायत महानगर पालिका मध्ये ५ % निधी खर्च करावा या माघण्या साठी सर्व दिव्यांग बंधू,भगिनीं,विधवा, परिकक्त्या यांनी उपस्थिती राहावे असे आव्हान करण्यात आले यावेळी दिलीप जुनगरे,दौलत अंभोरे, वंदना नाईकवाडे, विजय अंभोरे,सुमित्रा खंदारे, भिसे, गजानन सानप,रामेश्वर महाजन, दत्ता बुंदे,पंडित लबडे,शुभम भोर, सुरेखा सुर्वे, लोडू सुर्वे,सुमन ताजने,सिधु कळासरे,साहिल नवघरे,भागवत गुडदे, कडुबा गुडदे, चंद्रकात खराडे, रतन शिंदे, जुनगरे पंजाब अंभोर आदी होते