दुर्गम भागातील गावाला रस्ता मिळाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी
वाशीम केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने काटेपूर्णा जंगलाच्या दुर्गम भागातील पांगरी महादेव गावाला रस्ता मिळाला. यामुळे गावकर्यात आनंद व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पांगरावासी रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. त्यासाठी वारंवार प्रशासनाकडे निवेदने देऊन मागणी करण्यात आली. अखेर ना. गडकरी यांच्या प्रयत्नाने रस्त्याचा प्रश्न मार्गी
लागल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे. अकोला-वाशीम जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर सन
२००० साली अकोला जिल्ह्यातून बाशीम जिल्ह्यात पांगरी गावाचा समावेश करण्यात आला. परंतु, गावाला ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळू शकली नाही. राजकीय व प्रशासकीय उदासीनते पोटी हे गाव खितपत पडले. अनेक राजकीय लोकांनी वारंवार गावकर्यांना आश्वासना पलीकडे काहीच दिले नाही. तीन वर्षांपूर्वी जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून क्रमवारीने ग्राम विकासाला गतिमान केले. गावकर्यांच्या सर्वानुमते ठरलेल्या ग्रामसभा समितीच्या माध्यमातून विकासाची कामे केल्या जातात. अशा अनोख्या असलेल्या या गावाला चांगल्या अवस्थेतला रस्ता नव्हता. गतवर्षीही
बाब गडकरी यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घालून पत्रव्यवहार केला. याची दखल घेत राज्य शासनाने नुकताच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तर्हाळा ते पांगरी असा पाच कोटी ११ लक्ष ९१ हजार किंमतीच्या चार कि.मी. ३०० मीटर रस्त्याला प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे गावकर्यात
आनंद व्यक्त होत आहे.
गडकरीच्यांच हस्ते भूमिपूजन व्हावे
दुर्गम भागातील विकासाकरिता शासनाने घेतलेल्या पुढाकार पाहता आणि आगामी विकास कार्याच्या घोषणेसाठी ना. नितीन गडकरी यांनीच या कामाचे भूमिपूजन करावे असा आग्रह आम्हा गावकर्यांचा आहे. तसे नियोजन ग्रामसभा समन्वयक सचिन कुळकर्णी करीत आहे.
पांगरीत केंद्राचा मोठा प्रकल्प व्हावा
आमच्या पाठपुराव्याला आलेले यशाने हुरळून न जाता आम्ही केंद्राचा रोजगारभिमुख मोठा प्रकल्प या भागात कसा आणता येईल या प्रयत्नात आहो. पाण्याअभावी होणारे स्थलांतरण आता थांबले आहे. पांगरी गावकर्यांनी आता सभोतालच्या इतर गावांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी इच्छा आहे.