देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत शाळांनी सहभाग निश्चित करण्याचे आवाहन

वाशिम – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लॉयन्स क्लब वाशिमच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगष्ट रोजी ‘उत्सव आझादी का’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा अकोला रोडवरील वाटाणे लॉनमध्ये ठेवण्यात आली असून या स्पर्धेत भाग घेणार्या जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी १४ ऑगष्टच्या आत आपल्या शाळेची नोंदणी त्वरीत करुन घ्यावी असे आवाहन लॉयन्स क्लब ऑफ वाशिमचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे व प्रकल्प्रमुख आशिष ठाकूर यांनी केले आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )