पंचायत समिती उपसभापती गजानन गोटे यांचे तहसीलदार यांना निवेदन
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी बालाजी ठेंगडे) – तालुक्यातील मौजे किनखेळा, सावंगा, भोयता, सोयता परिसर येथे अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे शेतजमीन खरडून गेली आहे त्यामुळे पिकाचे अति नुकसान झाले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करून सुद्धा काही फायदा झाला नाही कारण जमिनीमधील माती पूर्णपणे पाण्याने खरडून गेलेली आहे तरी त्याचे सर्वे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता त्यानी हे निवेदन वाशिम तहसीलदार यांना काल दिनांक १५ जुलै सोमवारी दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News