पंतप्रधान मोदी रशियातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित
रशिया पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांना रशियातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू द अपॉस्टल असे या पुरस्काराचे नाव असून हा रशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांचा सन्मान केला
आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने मला सन्मानित केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष
व्लादिमीर पुतिन बाचे आभार मानतो. तसेच हा पुरस्कार मी भारतीयांना समर्पित करतो. हा सन्मान फक्त माझा नाही तर हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि रशिया यांच्यातील शतकानुशतके मैत्रीचा आणि परस्पर विश्वासाचा हा सन्मान आहे. प्रत्येक वेळी नवीन उंची गाठली आहे. यामुळे आपले परस्पर सहकार्य अधिक मजबूत होत आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
दरम्यान, या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले
आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शांतीचा संदेश दिला, ते म्हणाले की, युद्धाच्या मैदानात अडचणींवरील उपाय सापडत नाहीत. कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटत नाहीत. शांततेसाठी चर्चेची खूप जास्त गरज असते. भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. कारण बुद्ध हा अडचणीवरील उपाय नाही. मला शांततेची अपेक्षा आहे. मी शांततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे.
द्विपक्षीय चर्चेआधी मोदींनी मॉस्को येथील एका कार्यक्रमात तेथील भारतीयांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी इथे येताना एकटा आलेलो नाही. मी माझ्याचरोबर काही गोष्टी घेऊन आलोय. मी माझ्याबरोबर
भारतातल्या मातीचा गंध घेऊन आलोय, तुमच्यासाठी १४० कोटी भारतीयांचं प्रेम घेऊन आलोय. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर हा माझा परदेशातील भारतीय समुदायाशी पहिलाच संवाद आहे. हा खूप आंनददायी क्षण आहे. आज ९ जुलै असून मला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आज बरोबर एक महिना झाला आहे. मी आज तुम्हा सर्वांसमोर ठामपणे सांगेन की, माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकद लावून काम करेन. आधीपेक्षा तिप्पट वेगाने काम करेन. देशाचा विकास वेगाने करण्याची मी शपथ घेतली आहे.