पीएम किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज ठप्प कामकाजासाठी कर्मचारीच नसल्याचे वास्तव
कारंजा लाड नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असताना शेतकर्यांना खरीप हंगामात रासायनिक खते व बी बियाणे खरेदीसाठी मदत व्हावी, या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. परंतु आता मात्र या योजनेचे कामकाज पाहण्यासाठी कर्मचारीस नसल्याने कारंजा तालुक्यात या योजनेचे कामकाज ठप्प झाले आहे. शेतकर्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आता कारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याने योजना कसी राबवावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी कार्यालयात एक कंत्राटी कर्मचारी कर्तव्यावर होता. परंतु त्याची मुदत ३१ मार्चला
12600
संपल्याने व तेव्हापासून यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात न आल्याने आता या कार्यालयात उपरोक्त कामासाठी एकही कर्मचारी नाही. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. यासाठी मानधन तत्त्वावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जातात. परंतु मागील काही महिन्यांपासून नियुक्तीच केली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. पीएम किसान योजनेच्या जुन्या लाभार्थ्यांच्या अनेक अडचणी आहेत. त्याबाबतच्या
तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सतत सुरू असते. याशिवाय काही नवीन शेतकर्यांना नोंदणी करावयाची आहे. तसेच या नवीन शेतकर्यांना लाभ मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र, कर्मचारी नसल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शयता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा कार्यालयाकडून कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकर्यातून केल्या जात आहे.