पुसद रोडवरील उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यासाठी युवासेना आक्रमक

पुसद रोडवरील उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यासाठी युवासेना आक्रमक

वाशिम – गेल्या दोन वर्षापुर्वी उभारण्यात आलेल्या पुसद रोडवरील उड्डाण पुलावर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळेत गंभीर अपघातासह लुटमारीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. याठिकाणी पथदिवे बसविण्यासाठी युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून ही समस्या आठ दिवसात मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल भिमजीयाणी यांच्या नेतृत्वात सोमवार, २२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, पुसद रोडवर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचा लोकार्पण होवून आता जवळपास २ वर्षाच्या वर कालावधी झाला असून आजपर्यंत या उड्डाणपुलावर कुठल्याच प्रकारची विद्युत व्यवस्था केली नाही. या उड्डाण पुलावरुन मंगरुळपीर, पुसद, पंचशिल नगर, मानमोठे नगर व ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात ये- जा करतात. या उड्डाण पुलावरुन नागरिकांना रात्रीला भयभीत होवून

प्रवास करावा लागतो. अंधाराचा फायदा घेवून दबा धरुन बसलेले भुरटे चोर अनेक नागरिकांना बेधडक लुटतात. तसेच या ठिकाणी अंधाराच्या साम्राज्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होवून नागरिकांना दुखापत झाली आहे. वाशिम शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे रात्रं-दिवस वाहतूक सुरुच असते. त्यामुळे उड्डाणपुलावर लाईट बसविणे नितांत गरजेचे आहे. या मागणीसाठी युवा सेना जिल्हा समन्वयक

सुशिल भिमजियाणी यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी वाशिम व नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी या अधिकार्यांशी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी सविस्तर चर्चा करुन हा प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी लावावा अन्यथा शिवसेना, युवासेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल

असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके, जिल्हा सचिव गजानन नागोराव ठेंगडे, शिवसेना शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, शहर समन्वयक राजाभैय्या पवार, शहर संघटक नामदेवराव हजारे, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख रामकृष्ण वानखेडे, युवासेना जिल्हा सरचिटणीस नाना देशमुख, शहरप्रमुख आशिष इंगोले, तालुका सरचिटणीस भगवान वाकूडकर, उपशहरप्रमुख अकील तेली, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुनिता गव्हाणकर, तालुकाप्रमुख ज्योती खोडे, उपतालुकाप्रमुख ज्योती नप्ते, शहरप्रमुख रंजना पारीसकर, विशाल खंडेलवाल, श्याम दळवी, मनोज भोयर, रविंद्र पाटील, चंद्रकांत खेलुरकर, शेख अल्ताफ शेख अजीस, किशोर थोरात, नितीन जैताडे, सतीष खंडारे, संचालक कृ.उ. बा. समिती नंदकिशोर भोयर, आनंदा काळे, सैय्यद रशीद अली, शंकर महादेव सावके यांच्या स्वाक्षर्या आहेत.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )