प्रशिक्षित विद्यार्थी हेच भविष्यातील खरे आरोग्य दूत- डॉ. सतिश खुळे
गौरीशंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे घेतले प्रशिक्षण
वाशिम – वाशिम शहरातील गौरीशंकर विद्यालय नालंदानगर येथे दि.८ जुलै रोजी ५ वी ते १० वीच्या २१० विद्यार्थ्यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुंदर वाटिका मार्फ त पावसाळ्यात कीटकजन्य व जलजन्य उद्भवणाऱ्या आजाराची ओळख, कारक, घटक व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावेळी प्रशिक्षित विद्यार्थी हेच
भविष्यातील खरे आरोग्य दूत” असल्याचे मत यावेळी आपला दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील खुळे यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणामध्ये डेंग्यू डासाची ओळख, त्यांची उत्पत्ती स्थाने, त्यांची वाढ, डेंग्यू आजाराची लक्षणे याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना जसे की, गटारी, पाण्याचे डबके वाहती करणे, वाहती करता न येणारे पाणीसाठे त्यामध्ये
गप्पी मासे सोडणे, वाहते करणे शक्य नसणाऱ्या व पिण्यासाठी वापरात नसणाऱ्या पाण्यात टेमीफॉसच्या सहाय्याने ऍबेटिंग करणे, टाकाऊ टायर, भंगार साहित्य यांची विल्हेवाट लावणे. याविषयी मार्गदर्शन केले. सर्व
विद्यार्थ्यांना अळीभक्षक गप्पी मासे दाखवून त्यांना डेंग्यू आजाराबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉप वापरण्याचा संदेशदेखील देण्यात आला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांपैकी
एकूण १६७ विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी केलं.
यावेळी तालुका सिकलसेल सहायक संजाबराव गंगावणे, आरोग्य सहायक नितीन व्यवहारे, आरोग्य निरीक्षक ए.एस. सोनोने, आरोग्य सेवक प्रविण करखेले, आरोग्य सेविका श्रीम. राठोड, श्रीम. गायकवाड, श्रीम. लबडे, श्रीम. वाघमारे, श्रीम. अवताडे उपस्थित होते. यावेळी गौरीशंकर विद्यालय व्यवस्थापन, प्रबंधक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.