प्रिया राऊत ला सन्मान पुरस्कार जाहीर
कारंजा लाड – मुंबई येथील नॅशनल एज्युकेशन डेव्हलपमेंट या राष्ट्रीय संस्थांच्या वतीने दिला जाणारा समाजसेवा सन्मान पुरस्कार हा कारंजा तालुक्यातील दोनच येथील शेतकरी कन्या राऊत हिला जाहीर झाला आहे . विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या यावर्षीच्या सामाजिक कार्य साठीच्या पुरस्कार शेतकरी कन्या क्रियापक्ष राऊत यांना जाहीर करण्यात झाला आहे.
हा पुरस्कार गेल्या शनिवारी 25 मे रोजी मुंबई येथील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टल या पंच तारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनामध्ये प्रदान करण्यात येणार आहे . या पुरस्कार यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परख्यात उद्योगपती , हिंदू व मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर . शिक्षण तज्ञ उपस्थित राहणार आहे . नॅशनल एज्युकेशन अँड ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझर या संस्थेतर्फे या पूर्वी चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन , विजय पाटकर , रणजीत मसाला किंग धनंजय दादा चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन , जयश्री टी , आसावरी जोशी सोनाली कुलकर्णी , अशा अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रिया अक्षय राऊत हिला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाच्या वर्षाव केला जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या जात आहे .