बियर बार बंद करण्यासाठी महिलांचे बियरबार समोरच आमरण उपोषण
मलकापुरः – वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर सहजीवन गृहनिर्माण संस्थेच्या रहिवासी वस्तीमध्ये नव्याने सुरू झालेले श्रेयस बियरबार व मटन हॉटेल बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी यांना सोमवार रोजी एक निवेदन देवून सदरचा श्रेयस वाईनबार व मटन हॉटेल मुळे रहिवासी महिलांना व शाळकरी मुलींना दारुडे भयंकर त्रास देत असून महिलांना अश्लील शिविगाळ करीत रहिवासी महिलांना मानसिक त्रास देत असल्याने तो तात्काळ बंद करा अन्यथा १३ ऑगस्ट पासून महिला बार समोरच आमरण उपोषण करतील असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला होता. आज दि. १३ ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी महिलांनी श्रेयस बियर बार व मटन हॉटेल समोरच आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी महिलांनी “बियरबार बंद झालाच पाहिजे…. असा कसा होत नाही… झाल्याशिवाय राहणार नाही” अश्या घोषणा दिल्या यावेळी महिलांच्या आमरण उपोषणाला आदर्श नगर, साई नगर परीसरातील सौ. चंदा अनिल टेकाडे, सौ. निता महेश नारखेडे, सौ. अंजली सागर बेलोकार, सौ. लता सुधाकर थापडे, सौ. संगीता विजय नारखेडे सौ. सरिता लक्ष्मण डाके, सौ. अश्विनी निलेश खाचणे, लक्ष्मी ज्ञानदेव बोंबटकार सह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.