भावना गवळी यांची विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती

वाशीम विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून ११३ विधानसभा मतदारसंघांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी विधानसभा प्रभारी आणि विधानसभा निरिक्षकांच्या अधिकृतरित्या नियुत्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रिसोड आणि देवळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी आमदार भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ११३ विधानसभा मतदारसंघात ४६ विधानसभा प्रभारी आणि ९३ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही कमतरता राहू नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांची फौज तयारीसाठी उतरवली आहे. यामध्ये आमदार भावना गवळी पाटील यांच्यावर वाशीम जिल्ह्यातील रिसोड आणि वर्धा जिल्ह्यातील देवळी या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी शिवसेनेची मेगा बैठक झाली होती. या बैठकीला मंत्री, खासदार आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत आगामी

रामचरित मानस वर आधारित नाट्यमय प्रदर्शन असून, या मधील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला करमणुकी बरोबरच आदर्श जीवनाची शिकवण देऊन जातो, त्यांमुळे लहान मुलांन पासून ते जेष्ठ नागरिक पर्यंत यापुढील प्रयोगास जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे, जेणेकरून आपल्या लोककला टिकून राहतील असे आवाहन मयुर राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

निवडणूक, जागा वाटप आण पक्ष बांधणीसह विविध मुद्यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकार्यांना काही सूचना दिल्या. तसेच यावेळी त्यांनी आपल्याला आगामी निवडणुकीत चांगलं मताधिय मिळवायचं असल्याचं सांगितलं. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं. सरकारी योजना तळागळापर्यंत पोहोचवा. पक्षात नवे सदस्य आणण्यावर भर द्या. सदस्य नोंदणी वाढवा, यांसारख्या अनेक सूचना नेत्यांना दिल्या आहेत.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )