मनसे शेतकरी सेना बळीराजाच्या पाठीशी !!
*मनसे शेतकरी सेना बळीराजाच्या पाठीशी !!*
*मनसे मदत,सांत्वनपर भेट*
काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील कापडणे यागावी स्व.चंद्रकांत मिठाराम माळी हे शेतकरी शेतातील पेरणी पूर्व काम करत असताना बैलजोडीसह विजेच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी पूर्ण राज्यभर पसरली अन् शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत होती.
*सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे,मनसे शेतकरी सेना राज्य सचिव अमोलजी भिसे,धुळे जिल्हाध्यक्ष राकेशभाऊ चौधरी,धुळे शहराध्यक्ष बंटीबाबा सोनवणे,मनसे शेतकरी सेना धुळे जिल्हाध्यक्ष विकीराज गिरासे,शिंदखेडा तालुकाध्यक्ष बबनराव पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना वतीने शेतकरी माळी कुटुंबीयांना यांना मदतीचा हात देण्यात आला.*
यावेळी जयेश महाजन,राहुल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.