मनसे सभासद कामगारांच्या
पगारवाढीचा त्रैवार्षिक करारनामा
बडनेरा आज दिनांक ०३/ ०७/२०२४ रोजी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मे. जाधव गिअर्स ली. या आस्थापनेमधील मनसे सभासद कामगारांच्या पगारवाढीचा त्रैवार्षिक करारनामा करण्यात आला व त्यानुसार ५५००/- इतकी पगारवाढ करण्यात आली. सन्माननीय राज साहेब ठाकरे आणि युवानेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची यशस्वी घोडदौड विदर्भात अश्याच प्रकारे सुरु राहील अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस श्री केतन नाईक यांनी यावेळी दिली.
जिनिंग व्यवसायातील कंपन्यांची एकूणच परिस्थिती पाहता पगारवाढीत कामगारांनी मालकांची बाजू देखील समजून
घेत उपरोक्त वाढ स्वीकारली व भविष्यात काम वाढविण्यात सहकार्य राहील असे नमूद केले. मनसे कामगार सेना अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण, सरचिटणीस संतोषभाई धुरी, उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, निलेश पाटील, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री पप्पूभाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष राज पाटील, शहराध्यक्ष धीरज तायडे, गौरव बांते, कामगार सेना जिल्हा चिटणीस विक्की थेटे यांचे या करारनाम्यात मोलाचे सहकार्य लाभले.