महामार्गावरील चिखलाने घेतला पोलिस शिपायाचा जीव
मानोरा – कारपा येथील निवासी पोलिस विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेले अनिल नामदेव राठोड (वय ३७) यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात निधन झाले. लाखांदूर जिल्हा भंडारा येथे मृतक अनिल राठोड हे मागील तीन वर्षांपासून कार्यरत होते. लाखांदूर राष्ट्रीय महामार्गावरून ६ जुलै रोजी रात्री सव्वाअकरा वाजता दरम्यान कर्तव्य संपवून राहत असलेल्या ठिकाणी दुचाकीने जात असताना चिखलाचा अंदाज न आल्याने दुचाकी चिखलावरून घसरल्याने अनिल राठोड हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कारपा येथील मृत पोलीस कर्मचारी अनिल राठोड यांच्या मागे पत्नी व
मुलगा आहे. मृतक अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने कारपा आणि पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कारपा या गावी मृतक पोलिस शिपायाच्या अंतिम संस्कार साठी वाशीम येथील पोलिस पथक सलामी देण्यासाठी आले होते. यावेळी मनोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे आणि इतर कर्मचारी हजर होते. गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी जमा झाले