महाराष्ट्र दिनाचा अवमान प्रकरणी महावितरणच्याअधिक्षक अभियंत्यावर कारवाई करा
सामाजीक कार्यकर्ते चेतन इंगोले यांची मागणी
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) १ मे महाराष्ट्रदिनी अधिक्षक ध्वजारोहणासाठी शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकार्यांनी हे जाणीवपूर्वक अभियंता, कार्यकारी अभियंता तथा एचआर हेडचे अधिकारी गैरहजर राहीले. यासंदर्भात संबंधीत विभागात माहिती अधिकाराव्दारे मागीतलेल्या
कार्यक्रमाला उपस्थित राहून ध्वजाला अभिवादन करणे बंधनकारक असतांना येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला महावितरणचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे जाणीवपूर्वक गैरहजर राहीले. यासोबतच महावितरणच्या विविध कामामध्येही त्यांनी
गैरव्यवहार केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सेवेतून बरखास्त करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते चेतन इंगोले, विजय लाडुकर यांच्यासह इतरांनी १५ मे रोजी जिल्हाधिकारी तथा महावितरणच्या अकोला झोनचे मुख्य अभियंता यांना निवेदन देवून केली होती पण कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पुन्हा नव्याने रुजू झालेले मुख्य अभियंता अकोला झोन परिमंडळ सुहास रंगारी साहेब ३/७/२०२४ रोजी पुन्हा निवेदन दिले
निवेदनात नमूद आहे की, १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन हा महाराष्ट्रत सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करणे तथा प्रमुख अधिकारी व कर्मचार्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. असे असतांना महावितरणच्या मुख्य कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला
माहितीवरुन हे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सदर प्रमुख अधिकारी हे शहरात उपस्थित असतांना ध्वजारोहण कार्यक्रमाला जाणूनबुजुन अनुपस्थित राहीले. जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम शासकीय कार्यालयात घेण्यात येतात तेव्हा तेव्हा प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहतात व तृतीयश्रेणी कर्मचारीच हे कार्यक्रम साजरे करतात. त्या अनुषंगाने महाराष्ट्रदिनी महावितरणच्या कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तथा इतर अधिकारी अनुपस्थित राहील्याची छायाचित्रे
आणि चित्रफिती उपलब्ध असून यावरुन अधिकार्यांना ध्वजारोहणाप्रती किती आस्था आणि आदर आहे हे स्पष्ट दिसून येते. तरी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर प्रमुख अधिकार्यांवर कारवाई करुन त्यांना सेवेतून बरखास्त करावे अशी मागणी चेतन इंगोले यांच्यासह इतरांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर सुरज वानखेडे, आदित्य मिटकरी, महेश सारसकर, आदित्य काळे, शिवम देसाई, भूषण बाराहाते, स्वप्नील शेजुळकर, चेतन इंगळे, मोहीत ठाकुर, रतन वैरागडे, सिद्दीकभाई, गौरव दिग्रसकर आदींच्या सह्या आहेत.