महारोजगार मेळाव्यातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी
प्रणित मोरे यांचा पुढाकार, संदीपदादा कनेरकर यांचे मर्गदर्शन
कारंजा लाड – कारंजा येथे शुक्रवारी १४ जून रोजी प्रणित भाऊ मोरे मित्र परिवाराच्या वतीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता कारंजा मंगरूळनाथ मार्गावरील शेतकरी निवास येथे मान्यवरांच्या हस्ते या महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा व्याख्याते प्रबोधनकार व किर्तनकार सोपानदादा कनेरकर व प्रणित मोरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी त्यांनी आपल्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आजच्या परिस्थिती विषयी अवगत केले. तसेच काय करावे
करावे आणि काय करू नये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर महारोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या पेट्रोलियम, कनेटिंग इंडिया, डिलिव्हरी बॉय, कुरियर सर्विस, आर्किटेक हेल्पर
सर्विस, नर्सिंग, कॉल सेंटर, महावितरण, इंडस्ट्रियल, फार्मसी कंपनी, ऍग्रो कंपनी व बँकिंग या सारख्या १०० पेक्षा अधिक कंपन्यांनी उपस्थित युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. काहींना यावेळी नोकरीची ऑफर देण्यात आली. तालुयातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने प्रणित मोरे यांच्या संकल्पनेतून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महारोजगार मेळाव्यात जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील हजाराहून अधिक युवकांना यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध करून
देण्यात आल्याची माहिती महारोजगार मेळाव्याचे आयोजक
प्रणित मोरे यांनी दिली. या रोजगार
मेळाव्याला कारंजा तालुयातील हजारो युवक युवतींनी हजेरी
लावली. तर या महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अक्षय जगताप, श्रीरंग चौधरी, मुकेश जाधव, काटकर, सागर खंडागळे व किरण मोरे यांच्यासह अनेकांनी
अथक परिश्रम घेतले.