महावितरणच्या अधिकाऱ्याचा भोंगळ कारभार
वाशिम (कार्यकारी संपादक प्रताप नागरे) येथील समाजसेवक श्री विजय लाडुकर व श्री चेतन इंगोले यांनी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार दाखल केली की, प्रतिभा इलेक्ट्रिकल्स अंबेजोगाई व अधिक्षक अभियंता वाशिम यांच्या संगमताने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार दिसून येत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये ए बी केबल बदलण्याचे काम कंत्राटदार प्रतिभा इलेक्ट्रिकल्स अंबेजोगाई यांना मिळाले आहे तरी सदर कामात ए बी केबल टाकून जो जुना कंडक्टर (अल्युमिनियम तार) काढण्यात आलेला आहे तो नियमाने फिल्टर ऑफिस पुसद नाका वाशीम येथे जमा करणे अनिवार्य आहे तरी कंत्राट दाराने काढण्यात आलेला कंडक्टर सिव्हिल लाईन सबस्टेशन च्या गोडाऊन मधून ने आण करीत होते त्या ठिकाणी महावितरण कंपनीचा कोणताही अधिकारी व कर्मचारी गोडाऊन कीपर हजर नसताना गोडाऊनच्या कुलपाच्या
चाव्या ठेकेदार जवळ आहेत सदर गोडाऊन हे महावितरणचे
असल्यामुळे त्याच्या चाव्या ह्या महावितरणच्या गोडाऊन कीपर
यांच्याकडे असायला पाहिजे आणि जो कंडक्टर जमा करत आहेत
किंवा तेथून बाहेर नेत आहेत त्याची गेट पास असायला पाहिजे परंतु या
विपरित दृश्य बघितल्यावर श्री विजय लाडूकर व श्री चेतन इंगोले यांनी
स्वतः ठेकेदाराची चौकशी केली असता त्याने उडवा उडवी चे उत्तरे
दिले यामध्ये वाशिमचे अधीक्षक अभियंता व ठेकेदार प्रतिभा इलेक्ट्रिकल
अंबेजोगाई यांच्या संगमताने ने गैरव्यवहार घडत आहे असे दिसून आले
त्यामुळे ते गोडाऊन सील करण्यात यावे हा भोंगळ कारभार थांबविण्यात
यावा व अधीक्षक अभियंता व ठेकेदार यांची सखोल चौकशी करण्यात
यावी नाहीतर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल
असा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्री विजय लाडुकर व श्री चेतन
इंगोले यांनी दिला आहे