महिलेच्या विनयभंगप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
मंगरुळनाथ – महिलेचा विनयभंग व शिवीगाळ के ल्याप्रकरणी पोलीसांनी १२ जून चे रात्री दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुयातील धोत्रा येथील एका ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली की, १२ चे दुपारी दोन वाजता फिर्यादीची जाऊ व पुतणी जेवण करीत असतांना वासुदेव बळीराम राऊत व त्याचा मुलगा मनोज वासुदेव राऊत हे दोघे शिवीगाळ करु लागले.
त्यामुळे घराचा दरवाजा उघडला असता दोघे
जण घरात आले व मनोज राऊत याने विनयभंग केला. त्यावेळी माझी मोठी जावु ही मधात आली असता वासुदेव राऊत याने माझे जावुचा विनयभंग केला. यावेळी झटापटीमध्ये माझ्या गळ्यातील पोत तुटून कुठेतरी पडली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
CATEGORIES MAMGRULNATH