माझी लाडकी बहीण योजनेचे
६६ हजार अर्ज मंजूर !

वाशीम महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमीका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत वाशीम विधानसभा क्षेत्रातील एकूण ६६ हजार १०९ पात्र महिलांचे अर्ज १४ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित समिती सदस्यांच्या सभेमध्ये मंजूर झाले असल्याची माहिती या समितीचे सदस्य दीपक खडसे यांनी दिली.

वाशीम तहसील कार्यालयामध्ये १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता या समितीच्या सदस्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. वाशीम विधानसभा क्षेत्रातील वाशीम तालुयातील एकूण

३८,९०७ महिलांनी ऑनलाईन अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ३८,८४७ पात्र अर्ज मंजूर झाले असून, उर्वरित ६० अर्जाची मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगरूळनाथ तालुक्यातील एकूण २७, ३२९ पात्र महिलांनी शासनाकडे ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २७, २६२ अर्ज मंजूर करण्यात आले असून उर्वरित ६७ अर्ज त्रुटीमध्ये असल्याची माहिती समिती सदस्य दिपक खडसे यांनी दिली.

समितीच्या सभेमध्ये एकूण ६६ हजार १०९ पात्र अर्ज मंजूर झाले असून,

समितीच्या वतीने तसे प्रमाणपत्र जिल्हाधिकार्याकडे पाठविण्यात आले आहे. यासाठी आवश्यक निधीची मागणी जिल्हाधिकार्यामार्फ त शासनाकडे करण्यात येणार आहे, लवकरच पात्र महिलांना रक्षाबंधनाची भेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या सभेला समिती सदस्य दीपक खडसे, दिलीप काष्टे, वाशीमचे तहसीलदार पळसकर, मंगरूळपीरच्या तहसीलदार शितल बंडगर, वाशीम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन खुळे, मंगरूळनाथ पं.स.चे गटविकास अधिकारी रविंद्र सोनुने, महिला व बालकल्याण विभागाचे मदन नायक व इतर सदस्य उपस्थित होते.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )