
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे प्रतिपादन
वाशिम महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ दि. १३ जुलै रोजी मुंबई येथे करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांना त्यांच्य शिक्षणानंतर ६ महिन्याच्या कालावधीसाठी शासकीय तसेच खाजगी आस्थापनावर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) देवून त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्याचा उद्देश आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून सदर योजनेचा शासननिर्णय दि. ९ जुलै रोजी निर्गमित करण्यात ‘आलेला आहे. तरी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी
केले आहे. उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उपलब्ध होणार आहे कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी उमदेवारांचे विद्यावेतन दरमहा लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात (इढ) जमा होणार आहे. उमेदवारांनी सहा महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आस्थापनांकडून अनुभव प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. या योजनेअंतर्गत् प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व
औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. किमान २० रोजगार देणा-या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागास पात्र असणार आहे. खाजगी क्षेत्रातील आस्थापना /उद्योजकाकडे (लघु, मध्यम, मोठे उद्योग, स्टार्टअप्स) एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० % व सेवा क्षेत्रासाठी २०% इतके उमदेवार कार्य प्रशिक्षणासाठी घेवू शकतात. ६ महिने ऑनजॉब ट्रेनिंग (OJT) किंवा AppA°enticeship अंतर्भूत असणारे अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पात्र राहतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय / निमशासकीय आस्थापना / महामंडळे / सहकारी संस्थांना मंजुर पदाच्या ५% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेवू
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता किमान १२ वी पास / आयटीआय/पदविका/पदवीधर / पदव्युत्तर शिक्षण धारण केले असावे. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाहीत. उमेदवारांची आधार नोंदणी असावी. उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने विभागाच्या http://rojgar, mahaswayam.gov, in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना / उद्योजकाने विभागाच्या http:// rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षापूर्वीची असावी. आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST Certificate of incorpo ration, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी. १२ वी पास असणाऱ्या लाभार्थ्यांना ६ हजार प्रतीमाह, आयटीआय / पदविका ८ हजार प्रतीमाह, पदवीधर / पदव्युत्तरसाठी १० हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे.