मुख्यमंत्री युवा कार्य योजनेस शासकीय आस्थापनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री युवा कार्य योजनेस शासकीय आस्थापनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशिम – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र. क्र. ९०/व्यशि-३ दिनांक ०९ जुलै २०२४ नुसार शासकीय आस्थापनेवर एकूण मंजूर पदांच्या ५ टक्के उमेदवारांना कार्य प्रशिक्षण देणे शक्य आहे.

युवकांना आस्थापनेवर प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाची संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात शासकीय आस्थापनांचा या योजनेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आतापर्यंत सहा शासकीय आस्थापनांनी साधारणतः १५० पदे अधिसूचित केली असून त्या आधारे पात्र उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. सदर योजनेत शासकीय तसेच खाजगी आस्थापना सुद्धा सहभाग नोंदवू शकतात. शासकीय आस्थापनांना योजनेत पदे अधिक सूचित करण्याची विस्तृत माहिती व्हावी यासाठी दिनांक २६ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या निर्देशानुसार ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील बहुतेक सर्व शासकीय आस्थापनांनी सहभाग नोंदवून पदे अतिसुचित करण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील खाजगी आस्थापना साठी देखील अशीच कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र खाजगी तसेच शासकीय / निमशासकीय आस्थापनांनी या योजनेत सहभागी होऊन जास्तीत जास्त युवकांना कार्य प्रशिक्षणाची संधी द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )