मेहकर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा आर.पी.आय. मध्ये जाहीर प्रवेश
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य महासचिव वैभव धबडगे, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड सर यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन १४ आँगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये जाहीर प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश घडवून आणण्यासाठी आर.पी.आय. चे बुलढाणा जिल्हा प्रभारी अंबादास घेवदे व युवा जिल्हा प्रभारी सतिष पैठणे यांची भूमिका महत्त्वाची होती. पक्ष प्रवेशा नंतर प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मेहकर विधानसभा लढवणार असून आज पासूनच कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. पुढे त्यांनी सांगितले की सत्तेत जायचं आहे तर तसी
मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रस्थापितांच्या विरोधात लढायचे म्हणजे
तेव्हढ्या ताकदीने निवडणुकीच्या रणमैदानात उतरुयात. यावेळी
रामदास घेवंदे, सुरेश डवरे, अमोल टेकाळे, गजानन अवसरमोल, शेषराव अंभोरे, तेजराव अवसरमोल, नारायन मिसाळ. दिपक मोरे, समाधान मोरे, नरेश अडेलकर, भिमराव गवई, सुरेश डवरे, सुनिल मगरे, रवि आधळे, संतोश खरडे, भगवान कटारे, हरिष राऊत, किशोर लहाने, गजानन उमरे, देविदास मोरे, स्वप्निल सोनकांबळे, संजय गवई ईतर अनेक कार्यकरते उपस्तीत होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन अवसरमोल व आभार प्रदर्शन अशोक गायकवाड यांनी केले