मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
बंजरंग दलाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मानोरा – शहरातील दिग्रस या मुख्य चौकात रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, असे निवेदन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मोकाट जनावरे शहरातील रस्त्यावर, चौकात व रहदारीच्या ठिकाणी बसलेले दिसून येत आहे. या मोकाट जनावरांचा त्रास वाहतुकीला व ये-जा करणार्या नागरीकांना होत आहे. ही मोकाट जनावरे रस्त्यावर मुक्त संचार करीत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा बंजरंग दलाकडून मोकाट जनावरे गौरक्षण येथे नेवून सोडण्यात येईल, तेव्हा नगर प्रशासनाने वेळीच बंदोबस्त लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी विश्व हिंदू कोणत रकम बालस राजक याबाब परिषद व बजरंग दलाचे पदाधिकार्यांची उपस्थिती होती.