यवतमाळ वाशिम च्या खासदार कोण ?
Image Source: Esakal.com

यवतमाळ वाशिम च्या खासदार कोण ?

वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान झाले .शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ह्या येथून निवडून आल्या होत्या .मात्र यावेळी त्यांची उमेदवारी कापून शिंदे सैन्याने त्यांच्या जागी हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाले यांना रिंगणात उतरविले तर शिवसेना उभाठा गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख होते .येथून 17 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख अशीच होती .दोन्ही उमेदवारांनी विजयाचा गाव केलं असला तरी कोण जिंकणार याचा फैसला उद्या 4 जून रोजी होणार आहे .यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचे गड राहिला आहे . मात्र बदलेल्या राजकीय समीकरणामुळे या वेळची निवडणूक लक्षवेधी ठरली .मागील पाच टर्म पासून खासदार भावना गोळी येथून निवडून येत आहेत .मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाने ऐनवेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली .तर शिवसेनेने येथून पुन्हा भगवा बातमीसाठी आधीपासूनच्या माजी मंत्री संजय देशमुख यांना मैदानात उतरविले .येथून 17 उमेदवार लढत देत असले तरी खरी लढत ही शिवसेना शिंदे घटना चे उमेदवार राजश्री पाटील महाले विरुद्ध शिवसेना उभाता गटाचे संजय देशमुख यांच्यात झाली .लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात छब्बीस एप्रिल रोजी मतदार प्रक्रिया पार पडली .या मतदार संघात 2019 च्या तुलनेत मतदान वाढले ..यंदा सरासरी 62.87% मतदान झाले गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्का 1.78 टक्क्यांनी वाढला .शहरी भागात मतांची टक्केवारी कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र रानी भरभरून मतदान केले .19 लाख 40 हजार 916 मतदान पैकी 12 लाख 20 हजार 189 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६१.३१2 टक्के इतकी होती. वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला विजय मिळवून देते ..याची प्रतीक्षा उद्या संपणार आहे .दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दाव केला आहे .मतमोजणी उद्या चार जून रोजी होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे .84 टेबलवर सकाळी आठ वाजता पासून मतमोजणी सुरू होईल .यासाठी 800 कर्मचारीवर चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे .कोणी कितीही विजयाचे दावे केलेले असले तरी यवतमाळ वाशिम चा खासदार कोण हे उद्याच् स्पष्ट होईल . मात्र तत्पूर्वी सर्वांचीच धाकधूक वाढली आहे .

वाशिम कारंजातून कोण घेणार लीड !
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात .यापैकी वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा व वाशिम मंगरूळपीर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात.या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे .त्यामुळे येथे महा युतीचे उमेदवार राजश्री पाटील महाले यांनी लीड मिळणार की महाविकास आघाडीचे संजय देशमुख अधिक मताधिक्य घेतात .हे उद्याच निकालातून स्पष्ट होईल .

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )