रस्ता दुरुस्तीकरिता पाच वर्षांपासून पानगव्हाण वासीयांची अवहेलना
कारंजा लाड २०१० पासून पानगव्हान ते काजळेश्वर या तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर २०२४ पर्यंत रस्ता कोणत्या स्थितीत आहे, याची साधी तसदी सुध्दा प्रशासनाने घेतली नसून, आजतागायत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता डांबरीकरण होता की नाही ओळखणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र आंधळ दळते कुत्रं पीठ खाते अशी भूमिका घेत पानगव्हाण वासीयांची अवहेलना करीत आहे. पानगव्हाण ते काजळेश्वर या तीन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण तत्कालीन मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी केले होते तर डांबरीकरण २०१० मध्ये तत्कालीन आमदार प्रकाश चवथी नंतरचे शिक्षण नसल्याने
डहाके यांनी केले होते. जवळपास ९ वर्षानंतर हा रस्ता उखडला. या संदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना अनेकदा अवगत केले. परंतू या रस्त्याला रामा नंबर नसल्याचे सांगत बोळवण करण्यात आली. प्रथम रामा नंबर मिळवून मग रस्ता दुरुस्ती करता येईल असे सांगण्यात आले. या रस्त्यावरील पानगव्हाण शेजारील रपटा तीन वर्षांपूर्वी वाहून गेला तो सुद्धा करण्यात आला नाही. पानगव्हाण येथे
पुढील शिक्षणासाठी काजळेश्वर येथे जावे लागते. अशा रोडवरुन दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन दुचाकी चालवावी लागत असल्याने अपघात सुध्दा घडतात. शाळेतील विद्यार्थ्यांना चालतांना त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या रस्त्याच्या डांबरीकरण व पुल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी मागणी पानगव्हाण व काजळेश्वर येथील नागरिकांनी केली आहे.