राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी मनसेचे उपोषण चौथ्या दिवशीची सुरुच, विविध पक्ष आणि संघटनांचा पाठींबा
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) १ मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहणासाठी अनुपस्थित राहून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अधिकार्यांवर कारवाईसाठी अनेकवेळा निवेदन दिल्यानंतरही संबंधीत अधिकार्यावर कोणतीच कारवाई न झाल्यामुळे दिलेल्या इशार्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले उपोषण चौथ्या दिवशीची सुरुच होते. अद्याप या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसून मनसे जिल्हा सचिव प्रताप नागरे हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान सामाजीक कार्यकर्ते चेतन इंगोले व विजय लाडुकर यांनी उपोषणाला जाहीर पाठींबा दिला आहे.
दरम्यान १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाच्या अवमान प्रकरणी महावितरणचे अधिकारी व कर्मचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात १९ जुलै रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन हा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करणे तथा प्रमुख अधिकारी व कर्मचार्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. असे असतांना महावितरणच्या मुख्य कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तथा एचआर हेडचे अधिकारी हे जाणीवपूर्वक गैरहजर राहीले. यासंदर्भात संबंधीत विभागात माहिती अधिकाराव्दारे मागीतलेल्या माहितीवरुन हे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सदर प्रमुख अधिकारी हे शहरात उपस्थित असतांना ध्वजारोहण कार्यक्रमाला जाणूनबुजुन अनुपस्थित राहीले. महाराष्ट्रदिनी महावितरणच्या कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तथा इतर अधिकारी अनुपस्थित राहील्याची छायाचित्रे आणि चित्रफिती उपलब्ध असून यावरुन अधिकार्यांना ध्वजारोहणाप्रती किती आस्था आणि आदर आहे हे स्पष्ट दिसून येते. तरी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी महावितरणचे अधिकारी व कर्मचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांना सेवेतून बरखास्त करण्याची मागणी उपोषणकर्ते प्रताप नागरे, चेतन इंगोले, विजय लाडुकर यांनी केली असून याप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.