राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवशी ९७८ प्रकरणे निकाली

वाशिम, दि. १० ऑगस्ट (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार २७ जुलै २०२४ रोजी जिल्हयातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वाशिम एस. व्ही. हांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम व्ही. ए. टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखल पुर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकुण ८९१ प्रकरणांचा तसेच दाखलपुर्व ८७ प्रकरणे असे एकुण ९७८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून व एकुण रुपये २० कोटी ५७ लक्ष ७०५ रकमेची प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये वकील संघाचे व जिल्हा पोलीस दलाचे सहकार्य मिळाले.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )