वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण, संवर्धन व संगोपनाचा संकल्प करा – प्रा. संगीता इंगोले
वाशिम – वटपोर्णिमेनिमित्त सुवासिनींनी वडाची पुजा करण्यासोबतच मोफत प्राणवायु देवून मनुष्याचे जिवन सुकर करणार्या निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करुन या संपूर्ण जीवसृष्टीचा गुदमरलेला जीव वाचविण्यासाठी व्रतस्थपणे संकल्प घ्यावा असे आवाहन सामाजीक कार्यकर्त्या तथा सहयोग फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. संगीता वसंत इंगोले यांनी केले आहे.
वटपोर्णिमेनिमित्त सहयोग फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन सामाीक संदेश दिला जातो. एका वर्षातील १२ पोर्णिमेपैकी जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पोर्णिमा ही वटपोर्णिमा म्हणून सुवासिनी उत्साहात साजरी करतात. हा सण वटसावित्री म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पुजा केली जाते. यादिवशी स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाची पुजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्ण आणि महेश यांचा वास असल्याचे मानले जाते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगीतले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे. यासोबतच वडाचे झाडे हे १०० वर्षापेक्षा अधिक वर्षे जगते. जगाला विनामुल्य प्राणवायू देणार्या या वृक्षांचे अस्त्वि टिकावे, त्यांची संख्या वाढावी जेणेकरुन पृथ्वीला मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळावा यासाठी वटसावित्रीच्या पवित्र दिवशी सुवासिनींनी वडाच्या वृक्षासोबतच इतरही बहुउपयोगी वृक्षाचे वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन प्रा. संगीता इंगोले यांनी केले आहे.