वाढवलेल्या खतांच्या किंमती सरकारने नियंत्रणात आणाव्या
जतिन सोनोने – वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) – केंद्र सरकारने खतांच्या किमतीत आचानक वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा मोदी सरकार कडुन सुल्तानी संकट कोसळले आहे. सरकार ने वाढवलेल्या खताच्या किंमती तत्काळ मागे घ्याव्या अन्यथा राज्यातील शेतकरी रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते जतिन सोनोने यांनी म्हटले आहे. आधीच अवकाळी, अतिवृष्टी, गारपीटीने शेतकरी त्रस्त आहेत. त्यात सरकारने सोयाबीन आणि कापसाचे भाव प्रचंड पाडलेले आहेत. राज्यात पीक विमा योजनेचा बोजवारा उडाला आसुन बँकानी खरीपासाठी लागणाऱ्या पीककर्ज वाटपासाठी टाळाटळ चालवलेली आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आशा परिस्थितीत सरकारने खताच्या किमतीत केलेली वाढ समर्थनीय होवुच शकत नाही. त्यामुळे सरकार ने केलेली वाढ तातकळ रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जतिन सोनोने यांच्याकडून करण्यात आली आहे.